
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा उपक्रम
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा उपक्रम
३ दिवसीय वैद्यकिय शिक्षणातील मुलभूत अभ्यासक्रमावर कार्यशाळा उत्सहात
जळगाव – गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे तीन दिवसीय बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत वैद्यकिय महाविद्यालयातील ३० प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.कार्यशाळेचे उदघाटन दि १८ रोजी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील,डॉ चित्रा नेतारे एन एम सी चे निरीक्षक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. सुहास बोरोले, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे, डॉ सी.डी सारंग, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ.कैलाश वाघ, डॉ. शुभांगी घुले, डॉ. निलेश बेंडाळे,डॉ. देवेंद्र चौधरी,डॉ. बापुराव बिटे, डॉ. मिलींद जोशी, डॉ. मयुर मुठे, डॉ. माया आर्विकर, इ मान्यवर उपस्थीत होते.
दि १८ रोजी वैद्यकिय शिक्षणातील सामर्थ आधारीत शिक्षण प्रणाली अमलात आणण्यासाठी शिकवण्याची पध्दत, साधने, हेतू, ध्येयधोरणे, वैद्यकिय शिक्षणास आवश्यक असलेल्या नवीन शिक्षण पध्दती, इ तर १९ रोजी विदयार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व कौशल्य प्रयोगशाळा आधारीत प्रशिक्षण या बाबी जाणून घेणे, अंतर्गत मुल्यांकन पध्दती, संबंधी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाबींचा समुह अभ्यास करण्यात आला. समारोप प्रसंगी व्याख्याना अगोदरची तयारी कशी करावी, अंतर्गत मुल्यांकन व सामुहीक मुल्यांकन याचे महत्व विषद करणे इ वर या तिन दिवसीय कार्यशाळेतून मंथन करून वैद्यकिय क्षैत्रातील नवीन शिक्षण पध्दतीचे अवलोकन यावेळी करण्यात आले.
या कार्यशाळेत शिक्षकांनी सामुहीक रित्या कार्यशाळेला प्रतिसाद दिला. हा उपक्रम नॅशनल मेडिकल कमिशनच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नोडल सेंटर व राष्ट्रीय आरोग्य परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. कार्यशाळेत सुत्रसंचालन अंतरवासिय विदयार्थ्यांनी तर आभार डॉ. कैलाश वाघ यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या वैद्यकिय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे,प्राध्यापक व विदयार्थी समीतीने परीश्रम घेतले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम