डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मेंदूतील रक्ताची गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदू व मणका विकार तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा...

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मेंदूतील रक्ताची गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदू व मणका विकार तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नांना यश
जळगाव – अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवे येथील गणेश इंगळे या रुग्णाला वाहनाची जबर धडक बसली. यात रुग्णाच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्याच्या डोक्यात गंभीर रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णावर मेंदू व मणक्याचे विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत डोक्यात अ‍ॅक्युट सबड्युरल हिमॅटोमा म्हणजेच रक्ताची मोठी गाठ आढळून आली. या स्थितीत त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने, मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड आणि त्यांच्या टीमकडून क्रेनिओटॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅक्युट हिमॅटोमा इव्हॅक्युएशन या पध्दतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे डोक्याचा एक भाग उघडून त्या भागातील जमा झालेले रक्त पूर्णतः बाहेर काढण्यात आले. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचे प्राण वाचवले गेले असून, त्याची प्रकृती आता ठणठणीत आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. आशिष बावनकर, डॉ. ऋषिकेश कुळकर्णी, डॉ. किरण जोगावडे, भूलशास्त्र तज्ञ यांनी सहकार्य केले.

अशा स्वरूपाच्या गंभीर दुखापतीत वेळेवर निदान आणि तात्काळ शस्त्रक्रिया हे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अत्यावश्यक ठरते. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात अशा अत्याधुनिक शस्त्रक्रिया अनुभवी टीममार्फत यशस्वीरीत्या पार पाडली.
डॉ. विपूल राठोड, मेंदू व मणका विकार तज्ञ
योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया
या यशस्वी उपचारासाठी रुग्णास महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत सेवा पुरविण्यात आली. या योजनेमुळे गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक व महागडी शस्त्रक्रिया देखील मोफत मिळू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम