
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन
जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रांगणात श्रींचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. गणरायाचा आगमन सोहळा ढोल-ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाप्पाच्या आगमनासाठी आकर्षक सजावट केली होती. यावेळी डॉ. वैभव फरके यांच्या हस्ते गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. सी.डी. सारंग यांच्यासह महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना
जळगाव – डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी बाप्पाचे उत्साहात स्वागत केले. संपूर्ण परिसरात रंगीबेरंगी सजावट, फुलांची आरास आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे आनंददायी वातावरण निर्माण झाले. प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर व प्रशासन विभागातील राहुल गिरी यांच्या हस्ते करण्यात आली.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय
जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, येथे सवाद्य गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सपत्नीक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व वैद्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री गणेश स्थापना
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री गणेश स्थापना सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडी मिरवणूक काढली. महाविद्यालयाचा परिसर भक्ती, संस्कृती व परंपरेच्या रंगांनी दुमदुमून गेला.या वर्षी विद्यार्थ्यांनी इको-फ्रेंडली संकल्पना जोपासत टाकाऊ साहित्यापासून आकर्षक किल्ला सजावट केली आहे. पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारी ही सजावट विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. सुमित व सोनाली निर्मल यांच्या हस्ते श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी प्राचार्य, सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व साम्राज्य बॅचचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम