
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोरायसीसवर जागृती
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोरायसीसवर जागृती
जागतिक सोरायसीस दिनी त्वचा विकार विभागातर्फे उपक्रम
जळगावः येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जागतिक सोरायसीस दिनानिमीत्त व्याख्यानात त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. पंकज तळेले यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
२९ ऑक्टोबर हा जागतिक सोरायसीस दिन म्हणून पाळला जातो. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील त्वचा विकार विभागातर्फे व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. पंकज तळेले हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. स्वप्नील पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. पंकज तळेले यांनी सोरायसीस या आजाराची लक्षणे, निदान आणि त्यावरील उपचारासंबंधी तपशीलवार माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शरीराच्या कोणत्याही भागावर लालसर, जाड, खवलेयुक्त, वेदनादायक असे डाग निर्माण होतात. हा आजार संसर्गजन्य नाही आणि चुकीच्या स्वच्छतेमुळे होत नाही. त्वचेवर गोलाकार, जाड, लाल किंवा गुलाबी, खवलेयुक्त डाग निर्माण होतात. खाज, जळजळ, वेदना, किंवा पुरळ निर्माण होणे. नखांमध्ये बदल (जाड होणे, खड्डे किंवा क्रॅक पडणे). काही रुग्णांमध्ये सांध्यांमध्ये वेदना व सूज येणे. डोक्यावर, कोपर, गुडघे, पाठीचा खालचा भाग, हात, पाय, आणि टाळूला विशेषतः जास्त प्रभाव होतो. सोरायसिसविषयी गैरसमज हा त्वचा स्वच्छ न ठेवल्याने होत नाही आणि अजिबात संसर्गजन्य नाही. फक्त बाह्य आजार नाही मानसिक आरोग्यावर आणि समाजातील संबंधांवरही परिणाम करतो. वर्तमान औषधे व उपचार यामुळे आजार नियंत्रणात ठेवता येतो असेही डॉ. पंकज तळेले यांनी सांगितले.
यांनी घेतले परिश्रम
या कार्यक्रमाला तृतीय वर्षाचे १५० विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी त्वचा विकार विभागाचे डॉ. अभिलाष मोवळे, डॉ. आर्या कुळकर्णी, डॉ. मुस्कान खेतान यांनी परिश्रम घेतले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम