
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली
जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन व १५० व्या जयंती निमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सी. डी. सारंग, लेखा विभागाचे सुनिल बोंडे, रमाकांत पाटील तसेच विद्यार्थी विभाग प्रमुख अनंत इंगळे यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाच्या माध्यमातून सरदार पटेल यांच्या कार्याचा आणि राष्ट्रीय एकतेच्या संदेशाचा गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. सोळंके यांनी सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना ’लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. त्यांनी भारत देशाच्या एकीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली,
ज्यामुळे भारताच्या आजच्या नकाशाची निर्मिती झाली. ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. त्यांनी संस्थानांचे एकत्रीकरण करून एक मजबूत भारत तयार केला.आजचा भारत त्यांच्या दूरदृष्टी आणि अदम्य राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. असे सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम