
डॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार
डॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार
भुसावळ – बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना शिक्षणक्षेत्रात केलेल्या लेखनीय कार्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार जाहीर झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील थोरात महाविद्यालयात आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रदान करण्यात येणार आहे. जनआरोग्यम् संचलित जाणीव फाऊंडेशनतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण राज्यभरातून एकमेव डॉ. जगदीश पाटील यांचा लोकनेते बाळासाहेब थोरात राज्यस्तरीय आयकॉन पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम