
डॉ. ज्ञानदेव दातीर यांची पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या प्रदेश सहसचिवपदी बिनविरोध निवड
डॉ. ज्ञानदेव दातीर यांची पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या प्रदेश सहसचिवपदी बिनविरोध निवड
जळगाव – पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक विभागातून डॉ. ज्ञानदेव दातीर यांची प्रदेश सहसचिव (नाशिक विभागीय सचिव) पदी बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीनिमित्त पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात आयोजित आमसभेत त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील आणि सरचिटणीस डॉ. मारोती कानोले यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
चोपडा येथील डॉ. दातीर यांनी यापूर्वी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष म्हणूनही उत्कृष्ट काम केले आहे. सध्या ते चोपडा तालुक्यातील बोरअंजटी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल डॉ. रमण गावीत (विभागीय उपाध्यक्ष), डॉ. गणेश पाटील (जिल्हाध्यक्ष, जळगाव), डॉ. संदीप पाटील, डॉ. शांताराम पाटील (माजी विभागीय सहसचिव), डॉ. हेमंत कुमावत, डॉ. राहुल साळुंखे, डॉ. डी. पी. कोतकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम