
डॉ. धनंजय तळवणकर उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित
मुंबई येथे पुरस्कार प्रदान
खामगाव प्रतिनिधी
गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव चे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम या उपक्रमांतर्गत विविध योजना प्रभावीपणे महाविद्यालयामध्ये राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडविण्याच्या दृष्टीने केलेल्या अथक प्रयत्नांची पावती म्हणून उत्कृष्ट विभागीय प्राचार्य प्रवर्तक पुरस्काराने गौरविण्यात आले.
करियर कट्ट्याचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी करिअर कट्टाच्या वर्धापन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी नामदार उदय जी सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच डॉ. प्रफुल्ल पाठक संचालक स्किल कौन्सिल सेक्टर श्रीमती पाटोळे, डॉ. सोनाली लोहार व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांचे उपस्थितीत देण्यात आला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमा बाबत 2024 मधील विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. ह्या यशस्वी ते करिता प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम