
डॉ. पंकज भिवटे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड
समाजसेवेची दखल घेत जबाबदारी सोपवली
डॉ. पंकज भिवटे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड
समाजसेवेची दखल घेत जबाबदारी सोपवली
हिंगोली: दिल्ली येथे पार पडलेल्या ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल व संघटनेचे राष्ट्रीय सरक्षक राजे अमरजित सिंह बाळगळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंह होळकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन सिंह धनगर यांच्या आदेशाने भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. पंकज भिवटे यांची राष्ट्रीय सचिव तसेच मध्य प्रदेश व गोवा राज्याचे प्रभारी म्हणून निवड करण्यात आली.
डॉ. पंकज भिवटे हे अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ संपूर्ण देशभर कार्यरत असून, हजारो पदाधिकारी समाजासाठी कार्य करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये समाजहिताचे प्रचार-प्रसाराचे कार्य केले जाते.
डॉ. पंकज भिवटे यांच्या निवडीमुळे समाजात आनंदाचे वातावरण असून, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम