डॉ. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याची संधी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिरवणुकीत पालकमंत्र्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बातमी शेअर करा...

डॉ. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याची संधी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिरवणुकीत पालकमंत्र्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पाळधी प्रतिनिधी – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र केवळ घोषवाक्य नाही, तर समाज परिवर्तनाचा क्रांतीकारी महामार्ग आहे. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार करत प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क दिला. आजच्या तरुणांनी त्यांचे विचार वाचून आचरणात आणणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त पाळधी येथे पार पडलेल्या भव्य मिरवणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भीमसैनिकांसोबत ढोल-ताशांच्या गजरात सहभाग घेतला. यावेळी गुलाबपुष्पांचा वर्षाव, लेझीम पथक, सामाजिक संदेश देणारे फलक, आणि नागरिकांचा उसळलेला उत्साह पाहायला मिळाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे यांनी केले. सूत्रसंचालन चेतन नन्नवरे, तर आभार जे.डी. नन्नवरे यांनी मानले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सरपंच विजय पाटील, तसेच शरद कोळी, शरद कासट, अरुण पाटील, भगवान धनगर, उद्योजक दिलीप पाटील, अरविंद मानकरी, अनिल कासट, हाजी मण्यार, हाजी सुलतान, हाजी यासीन, तसेच नारायणआप्पा सोनवणे, सुरेश नन्नवरे, दिनकर पाटील, आबा माळी, अनिल माळी, माजी उपसभापती दिनकर पाटील आदींसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम