
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी जळगावात वाहतूक मार्गात बदल
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी जळगावात वाहतूक मार्गात बदल
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
जळगाव प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात सोमवारी सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीसाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित राहणार असल्यामुळे शहरातील टॉवर चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप आणि नेहरू चौक या प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करत या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्याचे काम सुरू केले आहे.
रविवारी रात्रीपासूनच अभिवादनासाठी अनुयायांची रेलचेल सुरू झाली असून, विशेषतः मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाने विशेष बंदोबस्त आखला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी आयोजित बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
जळगावात असा राहील बंदोबस्त
पोलीस अधीक्षक – १ अप्पर पोलीस अधीक्षक – १,उपविभागीय पोलीस अधिकारी – १,पोलीस निरीक्षक – ६,क्युआरटी – १, आरसीपी – १ , सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि होमगार्ड . तसेच शहरात शांतता आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम