डॉ. बेंडाळे महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

बातमी शेअर करा...

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा
जळगाव प्रतिनिधी I डॉ.अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालया मध्ये हिंदी दिवसानिमित्त हिंदी में रोजगार के अवसर और संवाद कौशल या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून मु.जे महाविद्यालय जळगाव च्या हिंदी विभागाचे डॉ. विजय लोहार उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात  विद्यार्थिनींना हिंदी भाषेचा इतिहास व समृद्ध साहित्य परंपरा सांगत हिंदी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध रोजगाराच्या संधीची माहिती दिली तसेच रोजगार प्राप्त करण्यासाठी संवाद कौशल्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी त्यांनी मातृभाषा आणि राजभाषा हिंदी यांचे  सहसंबंध सांगितले तसेच वर्तमानात भाषेच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. या प्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ. संजय रणखांबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,  परिचय आभार व्यक्त केले. करून दिला. कनिष्ठ विभागाचे प्रा. गजानन वंजारी उपस्थित होते. डॉ. देवेंद्र बोंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम