डॉ.बेंडाळे महाविद्यालयात ‘व्यावसायिक नैतिकता आणि आचारसंहिता’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…

बातमी शेअर करा...

डॉ.बेंडाळे महाविद्यालयात ‘व्यावसायिक नैतिकता आणि आचारसंहिता’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…

जळगाव : डॉ अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथे महाविद्यालयाच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’ समितीतर्फे ‘व्यावसायिक नैतिकता आणि आचारसंहिता’ या विषयावर प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी यांच्यासाठी  एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही.जे.पाटील हे होते. सुरुवातीला प्रा. आर.पी. मोरे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद केली. त्यानंतर प्राध्यापकांसाठी  पहिल्या सत्रात उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी ‘व्यावसायिक नैतिक मूल्ये व आचारसंहिता’ या विषयावर मार्गदर्शन केले.याप्रसंगी ते म्हणाले,अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रत्येकाने आपली आचारसंहिता पाळणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापन, कायदा व प्रशासनाचे नियम , अनुशासन, शिस्त प्रामाणिकपणा, संशोधनातील पारदर्शकता, नैतिक जबाबदारी कार्याप्रती असलेली निष्ठा अश्या विविध पैलूंदारे डॉ.साळवे यांनी व्यावसायिक नैतिक मूल्यांची जाणीव करून दिली.या सत्रात प्रमुख अतिथी  म्हणून माजी प्राचार्य  व्ही. पी.धांडे हे उपस्थित होते.पहिल्या सत्रातील व्याख्यानानंतर झालेल्या चर्चेत माजी प्राचार्य डॉ.व्ही.पी.धांडे यांनी सहभाग घेतला.
यानंतरच्या दुसऱ्या सत्रात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उपप्राचार्य डॉ.पी.एन. तायडे यांनी ‘शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असलेली आचारसंहिता’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये कार्यालयीन कामकाज, कामाचे नियोजन, व्यवसायाप्रती असलेली निष्ठा, ताण तणावाचे व्यवस्थापन, सहकाऱ्यांशी असलेला सुसंवाद, शिक्षक -विद्यार्थी आणि शिक्षकेतर सहकारी यांच्यातील सांगड या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती डॉ.तायडे यांनी दिली. त्यानंतर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. व्ही. जे.पाटील यांनी प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी यांची व्यवसायाप्रति असलेली नैतिकता व ते कार्य करत असताना पाळावयाची आचारसंहिता याविषयी विचार मांडले.तसेच उत्तम समाजाची निर्मिती होण्यासाठी,दर्जेदार विद्यार्थी घडविणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे असे मत त्यांनी मांडले. या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य के.टी.राणे यांशी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर. पी.मोरे यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.एच.आर.जाधव व डॉ.सुजाता गायकवाड यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेत मोठ्या संख्येने प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम