
डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात “सुंदर साजिरा श्रावण आला” कार्यक्रम उत्साहात संपन्न…
डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात “सुंदर साजिरा श्रावण आला” कार्यक्रम उत्साहात संपन्न…*
जळगाव: येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथे कला मंडळ,संगीत विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “सुंदर साजिरा श्रावण आला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला मंडळ प्रमुख डॉ.अनिता कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.व्ही. जे. पाटील होते.कार्यक्रमाचे उदघाट्न प्रमुख अतिथी जळगाव येथील हास्य जत्रा फेम प्रा. हेमंत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार ‘वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या कार्याचा गौरव करून संगीत विभागाच्या प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी विद्यापीठ गीत सादर केले. यानंतर प्रा. हेमंत पाटील यांनी उद्घाटनपर मनोगतातून विद्यार्थिनींना कलेची जोपासना करण्याचा संदेश दिला. तसेच आपल्याला आवडेल ती कला जोपासा असे सांगत,कला क्षेत्रातले अनुभव मनोगतातून मुक्तपणे मांडले.तसेच अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. व्ही. जे.पाटील यांनी कलेचे जीवनातील महत्त्व विशद केले.
. यानंतर पावसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थिनींनी मराठी, हिंदी सदाबहार लोकप्रिय पाऊस गीते सादर केली. यात अधीर मन झाले या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रिमझिम गिरे सावन, सावन मे मोरनी बनके, एक लडकी भीगी भागीसी, छम छम छम, सावन का महीना असे विविध सुरेल गीते सादर झाली.कार्यक्रमाची सांगता मराठी, हिंदी,इंग्रजी रिमिक्स पाऊस गीतांनी चैतन्यमय वातावरणात झाली. या गीतांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
. यावेळी उपप्राचार्य डॉ.पी.एन तायडे, डॉ. सत्यजित साळवे, सौ सुनीता पाटील व मान्यवर यांच्या उपस्थितीत कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सांस्कृतिक प्रतिनिधींचा निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार व प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी केले. कार्यक्रमास कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम