
डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात ग्रंथपाल डॉ. एस. आर. रंगनाथन दिवस साजरा
डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात ग्रंथपाल डॉ. एस. आर. रंगनाथन दिवस साजरा
जळगाव :येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त्य) येथे ‘ग्रंथपाल दिवस’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. जे.पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय ग्रंथालयाचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
ग्रंथालय हे वाचन संस्कृती रुजविण्याचे एक प्रभावी माध्यम असून विद्यार्थिनींमध्ये ग्रंथ वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त ज्ञानश्रोत केंद्र व रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथपाल दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा.ए.पी. सरोदे यांनी ग्रंथपाल डॉ.रंगनाथन यांचे ‘व्यक्तीत्व व कार्य’ या विषयावर महत्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.पी. एन. तायडे,डॉ.सत्यजित साळवे,सौ.सुनीता पाटील, ग्रंथालय समिती प्रमुख डॉ.देवेंद्र बोंडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.हर्षाली पाटील व समिती सदस्य तसेच प्राध्यापक बंधू -भगिनी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा दीपक पवार यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम