डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयात “बौद्धिक संपदा हक्क (IPR)” विषयावर कार्यशाळा

बातमी शेअर करा...

डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयात “बौद्धिक संपदा हक्क (IPR)” विषयावर कार्यशाळा

जळगाव ;- येथील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात (स्वायत्त) आज रोजी अंतर्गत गुवत्ता हमी कक्ष (IQAC), संशोधन प्रेरणा समिती व संशोधन विकास व नैतिकता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “बौद्धिक संपदा व हक्क(IPR): पेटंट प्रक्रिया, फाइलिंग,आणि प्रकाशन ” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळे साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चाळिसगाव तेथील प्रा. डॉ.विक्रम. एम. अगोने यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रा. श्रीमती रत्ना महाजन या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा.ऐश्वर्या परदेशी यांनी महाविद्यालय गीताने केली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विक्रम मधुकर अगोने यांनी आपल्या व्याख्यानात स्पष्ट केले की, “आजच्या संशोधन क्षेत्रात बौद्धिक संपदा हक्कांचे महत्व अत्यंत वाढले आहे.नवनवीन संशोधन कार्य व शोध संरक्षण करण्यासाठी पेटंट ही एक आवश्यक प्रक्रिया आहे.विद्यार्थी व संशोधक यांनी या विषयी सुजाण होऊन आपले संशोधन जागतिक स्तरावर पोहचवून देशाचा नावलौकिक उंचवावा” असे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी त्यांनी स्वतः च्या 12 पेटंटचे अनुभव कथन केले. तसेच पेटंट अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, व प्रकाशनातील टप्पे, कॉपी राईट,ट्रेड मार्क , डिझाईन पेटंट,औषधी सामग्री पेटंट,लोगो, ट्रेड सीक्रेट या बाबतची प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.व्ही. जे. पाटीत यांनी, समाजासाठी संशोधनाचे व पेटंटचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांना पेटंट दाखल करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

या कार्यशाळेचा उदेश्य विद्यार्थी,प्राध्यापक, संशोधक यांना बौद्धिक संपदा हक्कांचे महत्व कळावे असा होता. या कार्यशाळे प्रसंगी वक्त्यांचा परिचय संशोधन विकास समिती प्रमुख डॉ. आर. जी. बावने यांनी तर आभार प्रदर्शन संशोधन प्रेरणा समिती प्रमुख डॉ.सुहास पाटील व सूत्रसंचालन डॉ. शीला राजपूत यांनी केले. विचार मंचावर उपप्राचार्य डॉ.सत्यजीत साळवे, डॉ. पी.एन.तायडे, प्रो. स्मिता.एस.चौधरी, हे उपस्थित होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम