डॉ. यतीन बोरोले डी.आर.एन.बी.परीक्षा उत्तीर्ण

बातमी शेअर करा...

रावेर – प्रतिनिधी

जळगाव येथील डॉ. यतीन बोरोले हे डी.आर.एन.बी. (सुपर स्पेशालिटी गॅस्ट्रोलॉजी ) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी डी.आर.एन.बी. चे शिक्षण मुंबई येथील सुप्रसिद्ध एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे घेतले. त्यांना सुप्रसिद्ध डॉ. पद्मश्री अमित मायदेव यांचे मार्गदर्शन लाभले. ते जळगाव येथील डॉ. अजित बोरोले व यामिनी बोरोले यांचे चिरंजीव असून रावेर येथील सरदार जी.जी. हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक सतीश कोल्हे व कमलाबाई सुंदरलाल अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षिका हेमांगी कोल्हे यांचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. विनया बोरोले या फिजिओथेरपिस्ट आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तसेच मित्रमंडळी व नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम