डॉ. राधिका मनोहर पाठक यांचे भाषेचे तत्त्वज्ञान या विषयावर व्याख्यान

बातमी शेअर करा...

जळगाव प्रतिनिधी- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात प्रवेश परिचय कार्यक्रमांतर्गत डॉ. राधिका मनोहर पाठक यांचे “भाषेचे तत्त्वज्ञान” या विषयावर सोमवार दि. ०८ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा.म.सु. पगारे उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. राधिका पाठक म्हणाल्या की, भाषा म्हणजे भावना अभिव्यक्तीचे एक साधन आहे. तत्त्वज्ञानाची पद्धती अंगीकारल्या शिवाय तुम्ही त्या विषयात आपले संपूर्ण योगदान देऊ शकत नाहीत व त्या विषयावर संपूर्ण प्रभुत्व असल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करू शकत नाहीत. तसेच संशोधनाची पद्धत तटस्थ राहायला शिकवते, भाषा ही जपून वापरली पाहिजे तिचा शब्दप्रयोग चांगल्या प्रमाणात केला पाहिजे असे सांगत त्यांनी भाषा तत्वज्ञान या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. म.सु.पगारे यांनी अभिव्यक्ती हे भाषेचे आविष्कारण, सर्जन आणि सृजन, भाषेचे संकेत, भाषेचा अपभ्रंश हे बिंदू भाषेचा अभ्यास करताना अत्यंत महत्त्वाचे आहेत असे सांगितले. भाषा ही अभिव्यक्तीचे संकेत बनत जात असताना विविध प्रांतानुसार विविध भाषेची निर्मिती होत जाते. ज्ञान संवर्धनासाठी प्रमाण भाषा ही महत्त्वाची आहेच सोबतच कुठल्याही भाषेविषयी मनात भेदभाव न बाळगता भाषेवर प्रेम झाले पाहिजे असा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे असे सांगत त्यांनी प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील सहाय्यक प्रा. कृष्णा सदानशिव तर आभार खेमराज पाटील यांनी मानले. यावेळी प्रशाळेतील प्राध्यापक डॉ. प्रीती सोनी, डॉ. सुदर्शन भवरे, डॉ. दीपक खरात, स्नेहा गायकवाड, प्रतिभा गलवाडे नेहा लाम्हणे, महेश सूर्यवंशी यांच्यासह प्रशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम