डॉ. संदीप पाटील आय. एम. ए. ताप्ती व्हॅली संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष
उपाध्यक्ष पदी डॉ. सुचिता कुयटे
रावेर – प्रतिनिधी

यावल -फैजपूर- सावदा -रावेर या परिसरातील प्रतिष्ठित व नावाजलेल्या आय. एम. ए. ताप्ती व्हॅली या संस्थेचे अध्यक्ष पदी रावेरचे सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ व सुप्रसिद्ध अशा माऊली हॉस्डॉपिटल चे संचालक डॉ. संदीप पाटील यांची तर सचिव पदी डॉ. सुचिता कुयटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दि. 16 मार्च 2025 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हि निवड करण्यात आली. या सभेत डॉ. मिलिंद वानखेडे यांनी डॉ. संदीप पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष पदासाठी नाव सुचवले. त्याला अनुमोदन डॉ. सुनील चौधरी सावदा व डॉ. प्रवीण चौधरी रावेर यांनी दिले.
तसेच संस्थेचे सचिव पदासाठी डॉ. सुचिता कुयटे रावेर व डॉ. उमेश पिंपळे सावदा यांचे नाव सुचवण्यात आले. त्यासाठी अनुमोदन डॉ. दत्तप्रसाद दलाल रावेर व डॉ. व्ही. जे. वारके सावदा यांनी दिले . व सर्वानुमते ठरावास मंजुरी देण्यात आली.
सभेमध्ये नवनिर्वाचित सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. संदीप पाटील म्हणाले की यापूर्वीच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून आय.एम.ए.चे विविध उपक्रम राबवून समाजामध्ये आय.एम.ए.चे मानांकन वाढवलेले आहे. त्याच पद्धतीने काम करण्याचा मानस व्यक्त करून त्यांनी सर्वांचे आभार मानले. खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.

कार्यक्रमानंतर डॉ. दत्तप्रसाद दलाल यांचे इन्कम टॅक्स या विषयावर आपले मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात डॉ. समृद्धी प्रवीण पाटील हिने एम.बी.बी.एस पूर्ण केल्या बद्दल सर्व आय.एम.ए च्या सदस्यांच्या वतीने तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
वरील सर्व कार्यक्रम रावेर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला आय. एम. ए. यावल, रावेर ,फैजपूर ,व सावदा येथील सदस्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम