
डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत ऋषीकेश बारीचे यश
‘एआय इन सायबर सुरक्षा’ या विषयावर प्रोजेक्ट सादरीकरण
डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत ऋषीकेश बारीचे यश
‘एआय इन सायबर सुरक्षा’ या विषयावर प्रोजेक्ट सादरीकरण
जळगाव प्रतिनिधी
डॉ.होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत ऋषीकेश बारी ने राज्यस्तरावर यश प्राप्त केले आहे. ऋषीकेश बारी हा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्लास्टीक पार्क येथील इंटरनेट विभागातील सहकारी सुधीर बारी यांचे चिरंजीव व काशिनाथ पलोड पब्लीक स्कूलचा विद्यार्थी आहे. राज्यस्तरावर तीन लेव्हल मध्ये ही स्पर्धा झाली.
पहिल्या लेव्हलला ८८ हजार, दुसऱ्या लेव्हलला ६ हजार तर तिसऱ्या लेव्हलला ७०० बालसंशोधकांनी सहभाग घेतला. इयत्ता ९ वीत असलेल्या ऋषिकेश ने ‘एआय इन सायबर सुरक्षा’ या विषयावर प्रोजेक्ट सादरीकरण केला. उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्याला संपूर्ण राज्यस्तरातून यश प्राप्त होऊन ब्रॉन्झ पदक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन त्याचा गौरव झाला. त्याला त्याच्या शिक्षकांसह आई प्रिती बारींचेही मार्गदर्शन मिळाले. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम