
डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयात दिगंबर कट्यारे यांचे ‘विज्ञान आणि समाज’ या विषयावर व्याख्यान
महाविद्यालयातील विज्ञान मंडळ व आविष्कार समितीचे आयोजन
डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयात दिगंबर कट्यारे यांचे ‘विज्ञान आणि समाज’ या विषयावर व्याख्यान
महाविद्यालयातील विज्ञान मंडळ व आविष्कार समितीचे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी
येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील विज्ञान मंडळ व आविष्कार समिती यांच्या वतीने विज्ञानाचे अभ्यासक व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील दिगंबर कट्यारे यांचे ‘विज्ञान आणि समाज’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.पी. एन. तायडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख प्रा. ए.पी.सरोदे यांनी केले. त्यातून त्यांनी विज्ञान आणि समाज तसेच विद्यार्थिनींनी अंगीकारण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन या बद्दल भूमिका मांडली. त्यानंतर वक्ते दिगंबर कट्यारे यांनी ‘विज्ञान आणि समाज’ या विषयावर विद्यार्थिनींशी बोलताना, विज्ञानाची कास धरू!अंधश्रद्धा दूर सारू!! या उक्तीप्रमाणे समाजातील अंधश्रद्धा,बुवाबाजी, जादूटोणा, पर्यावरणाचा ऱ्हास या विषयांवर जनजागृतीपर भाष्य केले. त्यानंतर विविध प्रात्यक्षिकांच्या आधारे अंधश्रद्धा दूर सारून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थिनींना पटवून दिला. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य डॉ. पी. एन.तायडे यांनी विद्यार्थिनींना विज्ञान आणि संशोधन विषयांचे महत्त्व सांगत, श्रद्धा बाळगा पण त्याचा अतिरेक अंधश्रद्धेत करू नका असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मोनाली खाचणे यांनी केले. आभार प्रा. दीपक पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीतील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम