ड्युटी संपवून बसची वाट पाहत असताना भरधाव वाहनाची धडक; कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा...

ड्युटी संपवून बसची वाट पाहत असताना भरधाव वाहनाची धडक; कामगाराचा मृत्यू

जळगाव – ड्युटी आटोपून घरी जाण्यासाठी महामार्गाच्या कडेला बसची वाट पाहत उभ्या असलेल्या मनोज त्र्यंबक शिरसाळे (वय ५३, रा. गाडेगाव, ता. जामनेर) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आणि उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी हंबरडा फोडत मन हेलावणारा आक्रोश केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

मनोज शिरसाळे हे सुप्रिम कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करत होते. गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी ते नेरी गावात खासगी कामासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर रात्री ८ च्या सुमारास ते नेरी येथील महामार्गावर घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे होते. याचवेळी जळगावकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअप (एमएच १९ सीएक्स १०६८) ने अचानक त्यांना जबर धडक दिली आणि ते रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत कोसळले.

धडकेनंतर वाहनचालक पसार

अपघातानंतर घाबरलेल्या वाहनचालकाने तातडीने पळ काढला. काही तरुणांनी त्याचा पाठलागही केला, मात्र उमाळे फाट्याजवळ चालकाने वाहन रस्त्यातच लॉक करून अंधाराचा फायदा घेत तेथून फरार झाला.

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यु

गंभीर जखमी झालेल्या मनोज शिरसाळे यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. रात्री १० वाजता उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम