ड्रग्स पेडलरशी कथित संबंध; एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे निलंबित

पोलीस दलात खळबळ; सखोल चौकशीची प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा...

ड्रग्स पेडलरशी कथित संबंध; एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे निलंबि

पोलीस दलात खळबळ; सखोल चौकशीची प्रक्रिया सुरू

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना ड्रग्स पेडलरशी कथित संबंध आल्याच्या पार्श्वभूमीवर निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ही कारवाई केली असून, प्रकरणाची सखोल चौकशी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अलीकडेच एमआयडीसी परिसरात ड्रग्स पेडलर अबरार कुरेशीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. या तपासादरम्यान एलसीबीमधील काही अधिकाऱ्यांचे या संशयिताशी संपर्क असल्याची माहिती समोर आली. यामध्ये उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे नाव ठळकपणे पुढे आले.

प्राथमिक चौकशीत पोटे यांच्याकडे थेट संबंधाचे ठोस पुरावे सापडले नसले, तरी पोलीस खात्यात कार्यरत असताना कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात राहावे, याचे भान न राखल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या आधीही एलसीबीच्या दोन कर्मचाऱ्यांचा एका गुटखा विक्रेत्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसत असून, अधिकाऱ्यांची निगराणी आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम