
तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी पेटवली
तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी पेटवली
जळगाव : पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग आल्याने अब्दुल बफाती भिस्ती (वय ३५, रा. शाहूनगर, भिस्ती मोहल्ला) यांची (एमएच १९, ईएन ५०४०) क्रमांकाची दुचाकी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पेटवून दिली. ही घटना दि. ५ रोजी रात्रीच्या सुमारास मटन मार्केटजवळ घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शाहू नगरातील भिस्ती मोहल्ला येथील मटन मार्केटजवळ अब्दुल भिस्ती हे वास्तव्यास असून ते इलेक्ट्रीशन आहेत. त्यांनी काही संशयितांविरुद्ध पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग आल्याने दि. ५ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास भिसती यांनी घरासमोर लावलेली (एमएच १९, ईएन ५०४०) क्रमांकाची दुचाकीला अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळून टाकले. ही घटना भिस्ती यांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोहेकॉ अल्का वानखेडे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम