तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कांचन नगरातील हृदयद्रावक घटना

बातमी शेअर करा...

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कांचन नगरातील हृदयद्रावक घटना

जळगाव : शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. योगेश घनश्याम काळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

रविवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास योगेशने घरी कुणीही नसताना गळफास घेऊन जीवन संपवले. काही वेळाने त्याची आई घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडताच तिला एकुलत्या एक मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ही दृश्य पाहून त्या हंबरडा फोडीत कोसळल्या. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना धीर दिला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. डॉक्टरांनी तपासणीनंतर योगेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगेश हा आई व मामासोबत राहत होता. मजुरी करून कुटुंबाला आधार देत होता. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयात नातेवाईक व मित्रांनी आक्रोश केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम