
तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
नशिराबाद येथील घटना
जळगाव प्रतिनिधी
घरातील सदस्य गाढ झोपेत असताना नशिराबाद येथे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. कपिल सुरेश सपकाळे (वय ३२, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले.
रविवारी (दि. २३ मार्च) सकाळी घरातील सदस्य जागे झाल्यावर कपिल यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम