
तरुणाचे विष प्राशन ; उपचारादरम्यान मृत्यू
तरुणाचे विष प्राशन ; उपचारादरम्यान मृत्यू
पिंप्राळा येथील घटना
जळगाव – शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनोद अमृत सोनवणे (वय ४०, रा. पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, उपचार सुरू असतानाच बुधवारी दि. १८ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम