तरुणाच्या डोक्यात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून घातला दगड

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

तरुणाच्या डोक्यात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून घातला दगड

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : केवळ दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून राग आल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील धानवड येथे घडली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की संजय भास्कर पाटील (रा. धानवड, ता. जळगाव) हे आपल्या दुचाकीवरून गावात जात असताना त्यांनी वाहनाचा हॉर्न वाजविला. यावरून जयेश सुभाष वंजारी (रा. चिंचोली, ता. जळगाव) याने रागाने प्रतिक्रिया दिली. संजय पाटील यांच्यावर अचानकपणे हल्ला करत जयेशने त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. या हल्ल्यात संजय पाटील यांना डोक्याला गंभीर इजा झाली.

हल्ल्यानंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जखमी संजय पाटील यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध भादंवि कलमांन्वये गुन्हा दाखल केला.पुढील तपास हवालदार मुकुंद पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम