तरुणाच्या मृत्यूप्रकरणी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल

नशिराबाद येथे घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत तरुण तेजस सुनील बिऱ्हाडे याचा मृत्यू झाल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १५ मे रोजी घडली. नशिराबाद (ता. जळगाव) येथील तेजस बिऱ्हाडे दुचाकीवरून जळगावकडे येत असताना भरधाव आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तेजस यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम