
तरूणाचे बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी तीन लाखांचा ऐवज चोरला
यावल तालुक्यातील पूर्णवाद नगर येथील घटना
तरूणाचे बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी तीन लाखांचा ऐवज चोरला
यावल तालुक्यातील पूर्णवाद नगर येथील घटना
जळगाव प्रतिनिधी
अज्ञात चोरट्याने तरूणाचे बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत ३ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना यावल तालुक्यातील पूर्णवाद नगर येथे . याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज अमृत बारीहे ३ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पंकज बारी हे साकळी येथे मंदिरासाठी पुट्टी भरण्यासाठी गेले होते. त्यांचे वडील सकाळी ६ वाजल्यापासून चहाच्या दुकानावर होते. आई मनुदेवी मंदिरावर कीर्तन ऐकण्यासाठी गेली होती. घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने घरफोडी केली.
दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पंकज बारी यांची आई घरी परतली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर कपाट उघडे आणि सामान विखुरलेले होते. पंकज बारी यांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता कपाटातील रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेले होते. यात १ लाख १२ हजारांची रोकड, सोन्याचे मनी, अंगठ्या, चांदीचे हाताचे कडे, कमरपट्टा असा एकुण ३ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे.
पंकज बारी यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम