
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण अटकेत
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण अटकेत
रावेर पोलिसांची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : बऱ्हाणपूर रोडवरील बालाजी टोल नजीक एका तरुणाने तलवार घेऊन दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला असून, रावेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली आहे.
आकाश लक्ष्मण भील (रा. रामदेव नगर, रावेर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित बालाजी टोल परिसरात तलवार घेऊन फिरत होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल योगेश महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ हमीद तडवी करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम