तलाठीसह तिघांना २५ हजारांची लाच घेताना एसीबीची रंगेहात अटक; चाळीसगावात खळबळ

बातमी शेअर करा...

तलाठीसह तिघांना २५ हजारांची लाच घेताना एसीबीची रंगेहात अटक; चाळीसगावात खळबळ

चाळीसगाव :शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यातील कालबाह्य नोंद कमी करण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच घेताना महिला तलाठीसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. ३०) करण्यात आली असून चाळीसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर मौजे पाथरजे (ता. चाळीसगाव) येथील वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर असलेली जुनी व कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदाराने तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम (वय २९, रा. हरी ओम नगर, चाळीसगाव) यांची भेट घेतली असता, त्यांनी काम रोजगार सेवक वडिलाल पवार (रा. लोंजे) यांच्याकडून करून घेण्याचा सल्ला दिला.

पवार यांनी काम करून देण्यासाठी थेट २५ हजारांची लाच मागितली. त्यानंतर खाजगी व्यक्ती दादा बाबू जाधव (रा. लोंजे) यानेही तक्रारदारावर लाच देण्यासाठी दबाव आणला.

तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत विभागाकडे मांडल्यानंतर ३० जुलै रोजी एसीबीने सापळा रचला आणि तलाठी कार्यालयाबाहेर पवार यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. यानंतर तलाठी मोमीन व खाजगी व्यक्ती दादा जाधव यांनाही अटक करण्यात आली.

या तिघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम