तहसीलदारांचे ‘मी पेट्रोल आणून देतो, आत्ताच मरा’ – असंवेदनशील वक्तव्य

बातमी शेअर करा...

तहसीलदारांचे ‘मी पेट्रोल आणून देतो, आत्ताच मरा’ – असंवेदनशील वक्तव्य

शेतकरी संतप्त, आत्महत्येचा प्रयत्न रोखला

खामगाव (जि. बुलढाणा) – प्रशासनातील असंवेदनशीलतेचे धक्कादायक उदाहरण खामगाव तहसील कार्यालयात समोर आले असून एका शेतकऱ्याने दिलेल्या निवेदनावर प्रतिसाद देताना नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी केलेले वक्तव्य संतापजनक ठरले आहे. “सात दिवसांनी का मरता? मी पेट्रोल आणून देतो, आत्ताच मरा” असे शब्द वापरत त्यांनी आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याची थेट चेष्टा केल्याचा आरोप आहे.

शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने तो गेल्या काही दिवसांपासून अत्यंत त्रस्त होता. अनेकदा अर्ज, विनंत्या करूनही त्याच्या तक्रारीवर प्रशासनाकडून काहीच तोडगा न निघाल्याने त्याने तहसील कार्यालयात निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला होता.

मात्र परिस्थितीची गंभीरता समजून घेण्याऐवजी नायब तहसीलदारांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी संतापला आणि तात्काळ तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हस्तक्षेप करून त्याला खाली खेचले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या असंवेदनशील वागणुकीचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष, त्रासलेल्या शेतकऱ्याची चेष्टा आणि बेजबाबदार वर्तन हे अत्यंत निंदनीय व चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया Gramस्थरावर उमटत आहे.

या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीची मागणी होत असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम