
तांबापुरा येथे १७ वर्षीय मुलाला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
तांबापुरा येथे १७ वर्षीय मुलाला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव, [प्रतिनिधी ]: आपल्याकडे पाहून बोलत असल्याच्या संशयावरून १७ वर्षीय मुलाला शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, १८ जुलै रोजी रात्री ९:३० वाजता तांबापुरा येथे घडली. या प्रकरणी शनिवारी, १९ जुलै रोजी रात्री १२:३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तांबापुरा परिसरात वास्तव्यास असलेल्या आशाबाई मधुकर शेटे (वय ४२) यांचा मुलगा चेतन मधुकर शेटे आणि त्यांची नणंद दुर्गाबाई बाळू शिंदे हे दोघे शुक्रवारी, १८ जुलै रोजी रात्री ९:३० वाजता बोलत होते. त्यावेळी तांबापुरा भागातील भुऱ्या, अरबाज युनूस तडवी आणि इतर दोन अनोळखी मुलांनी चेतन शेटे आपल्याकडे पाहून बोलत असल्याचा संशय घेऊन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
मुलाला मारहाण करत असल्याचे पाहून त्याची आई आशाबाई आणि दुर्गाबाई यांनी धाव घेतली असता, त्यांनाही धमकी देण्यात आली. या प्रकारानंतर आशाबाई शेटे यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी, १९ जुलै रोजी मध्यरात्री १२:३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात भुऱ्या, अरबाज युनूस तडवी आणि इतर दोन अनोळखी मुलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम