
तांबेपुरा भागात युवकावर चारचाकीने हल्ला; लोखंडी रॉडने मारहाण, तिघांवर गुन्हा
तांबेपुरा भागात युवकावर चारचाकीने हल्ला; लोखंडी रॉडने मारहाण, तिघांवर गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील तांबेपुरा भागात एका तरुणावर चारचाकीने धडक देत, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, तिघांविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश राजेंद्र पाटील हा ३० जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तांबेपुरा येथील शिवशक्ती चौकात आपल्या मित्रांसोबत उभा असताना एका चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यानंतर गाडीतून उतरणाऱ्या राजवीर आणि त्याची आई सोनी यांनी लोखंडी रॉडने तसेच हाताबुक्क्यांनी जयेशवर हल्ला केला. त्यात राजवीरचा मामा करतारसिंग यानेही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत जयेशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम