तांब्याचे भंगार चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा...

तांब्याचे भंगार चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरातील सुमारे साडेतीनशे किलो तांब्याचे भंगार आणि वायर चोरणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 84 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जगवाणी नगरातील गेटसमोरील दुकान क्रमांक ४ मध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर आणि चैनल गेट तोडून प्रवेश केला. दुकानातून सुमारे १.८५ लाख रुपये किमतीचे तांब्याचे तार चोरीस गेले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित रितेश संतोष आसेरी (वय ४६, रा. रणछोडदास नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व साथीदार रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (वय ३२) याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही रामानंदनगर परिसरातून अटक केली.

दोन्ही आरोपींकडून १०० किलो वजनाचे नवीन व जुने तांब्याचे तार, एकूण ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पो.उ.नि. राहुल तायडे, पो.हे.काँ. गणेश शिरसाळे, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंह पाटील, रवी नरपाळे आणि अक्रम शेख यांनी मोलाची भूमिका बजावली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम