तापी नदीत आत्महत्या केलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा...

तापी नदीत आत्महत्या केलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळला

अमळनेर/भुसावळ : भुसावळ येथील एका प्रौढाने तापी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ८ रोजी घडली होती. या प्रौढाचा मृतदेह तापी नदीतून वाहताना अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे सापडला.

भुसावळ शहरातील गडकरी नगरमधील न्यू राम मंदिरजवळ राहणारे धनंजय दत्तात्रय ठेंग (वय ४८) यांनी ८ रोजी भुसावळ येथील तापी नदीवरील पुलावर बूट काढून व दुचाकी पुलावर लावून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती.
या प्रकरणी भुसावळ पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, धनंजय ठेंग यांचा मृतदेह ११ रोजी अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे वाहताना आढळून आला. या प्रकरणी मयताचे शालक तथा अमरावती येथील नगरसेवक ललित राजेंद्र झंजाड (रा. झंजाडपुरा, बडनेरा) यांनी दिलेल्या माहितीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम