तापी नदीपात्रात अवैध वाळू उपसा

बातमी शेअर करा...

तापी नदीपात्रात अवैध वाळू उपसा

मुक्ताईनगर तहसीलदारांची धडक कारवाई

मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात तापी नदी पात्रालगत सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर तहसीलदार गिरीश रामेश्वर वखारे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने धडक कारवाई केली. या प्रकरणी ट्रॅक्टरचा अज्ञात चालक, मुकेश धनगरसंजय धनगर यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी महसूल पथक गस्त घालत असताना तापी नदीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारा MH-19 AN 0535 क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला. तपासणीदरम्यान नदी पात्रालगत सुमारे एक ब्रास वाळू साठवलेली असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत मुकेश धनगर याने रेती उत्खनन व वाहतुकीची कबुली दिली.

दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच संबंधित ट्रॅक्टर व संशयित घटनास्थळावरून पसार झाले. पुढील तपासात ट्रॅक्टर हा संजय धनगर यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट झाले असून, दोघेही अवैध रेती व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र महसूल संहिता व भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध वाळू उपशावर कडक कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम