तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा संचार ; गावात भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा...

तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा संचार ; गावात भीतीचे वातावरण

चोपडा प्रतिनिधी |

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक गावात बिबट्या फिरत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चामुंडा माता मंदिराजवळ बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून, सरपंच रेखाबाई किशोर चौधरी यांनी तत्काळ वनविभागाला घटनेची माहिती कळवली आहे.

याआधीही काही दिवसांपूर्वी गावात बिबट्या दिसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर वनविभागाने पाहणी केली असता बिबट्याचे कोणतेही ठसे किंवा हालचालीचे पुरावे आढळले नव्हते, असे वनअधिकारी सारिका कदम यांनी सांगितले. तथापि, पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे.

गावातील सरपंच, पोलीस पाटील व नागरिकांनी वनविभागाला त्वरीत कारवाई करून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तावसे बुद्रुक, कुरवेल आणि खाचणे परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असा इशारा वनविभागाने दिला आहे.

वनविभागाने परिसरात गस्त वाढवण्यासह पिंजरे लावण्याची तयारी सुरू केली असून, गावात सुरक्षा उपाय वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम