
तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव ; मिरवणुकीत १०० कलाकार साकारणार १३ देखावे
ढोल-ताशांच्या गजरात घुमणार छत्रपती शिवरायांचा जयघोष..
तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव ; मिरवणुकीत १०० कलाकार साकारणार १३ देखावे
ढोल-ताशांच्या गजरात घुमणार छत्रपती शिवरायांचा जयघोष..
ठाणे:प्रतिनिधी
शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, ठाणे आयोजित सालाबादप्रमाणे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व खासदार मा. श्री. नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव २०२५ उत्साहात साजरा होणार आहे. तिथीप्रमाणे सोम १७ मार्च सायं. ४.३० वा. शिवसेना शाखा, श्री विश्वेश्वर मंदिर स्वा. सावरकर नगर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून जय जय महाराष्ट्र गीताने मिरवणूकीचे प्रस्थान होणार आहे
या मिरवणुकीत ब्रास बॅन्ड, तरुणाईचे या हो या शिवराया…गीत नृत्यातून शिवचरित्र व संस्कृतीचे दर्शन, परंपरा जपणारे फेटेबाज नेते,आकर्षक शिवप्रतिमा टेम्पो, दांडपट्टा आणि पारंपरिक साहसी खेळ, शानदार लेझीम, पुणेरी ढोल-ताशाच्या गजर, बैलगाडी वर महाराष्ट्राच्या पारंपारिक पोशाखातील मुली, नऊवारी साडीसह फेटे घालून महिला, टाळ मृदंगाच्या तालावर वारकरी. पालखी घेत वाजतगाजत येणारी दिंडी, भजनाचा गजर, आणि लक्षवेधी ऐतिहासिक लाल महाली वाटे शाहिस्ते खानाची छाटली बोटे चलचित्र देखावा असणार आहे.
मिरवणुकीचा मार्ग शिवसेना शाखा, स्वा. सावरकर नगर श्री विश्वेश्वर मंदिरातून उजवे वळण घेऊन भारतरत्न रा .ज. ठाकूर कॉलेज डावे वळण घेऊन महात्मा फुले नगर, आई माताजी मंदिर, यशोधन नगर, लोकमान्य बस स्टॉप ,जुने लोकमान्य बस स्टॉप, डावे वळण घेऊन एकता मित्र मंडळ,पाण्याची टाकी उजवे वळण घेऊन ज्ञानोदय विद्यामंदिर, डेनिस कंपाऊड ,गोकुळ डेरी डावे वळण घेऊन वीर हॉस्पिटल, ओंकारेश्वर सार्वजनिक उत्सव मंडळ येथे समाप्ती होणार आहे असा मिरवणूक मार्ग असणार आहे.
या शिवजन्मोत्सव २०२५ मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा नगरसेवक, गटनेते दिलीप बारटक्के यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम