तीर्थंकर प्रभू महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव समितीची बैठक

१० एप्रिल २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सादर

बातमी शेअर करा...

तीर्थंकर प्रभू महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव समितीची बैठक
१० एप्रिल २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सादर

जळगाव प्रतिनिधी

सकल जैन श्री संघ, जळगाव प्रणित तीर्थंकर प्रभू महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२५ ची नियोजनात्मक बैठक स्वाध्याय भवन येथे नुकतीच संपन्न झाली. ह्या समितीचे अध्यक्ष राजकुमार सेठिया यांनी १० एप्रिल २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा सादर केली. सहा दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि बोधप्रद कार्यक्रमांची श्रृंखला प्रस्तूत करण्याचे ठरले आहे. मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतीलालजी मुथा, पुणे हे उपस्थित राहणार असून त्यांचे विशेष प्रेरक वक्तव्य होईल. त्यांच्या एकूणच सामाजिक कार्याचा अनुभव आणि व्याप्ती पाहता हे वक्तव्य सर्वांनी ऐकण्यासारखे असेल.

या कार्यक्रमांच्या आयोजनात सर्व सहकारी संघटना, व्यक्ती विशेष यांनी सहकार्य व समर्थन करण्याचे आवाहन करण्यात आले. जेणे करून हा महोत्सव ऐतिहासिक व उल्हासात साजरा करता येईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध कार्य समित्यांची नियूक्ती करण्यात आली. सर्वांनी आपले योगदान देत चांगल्या कल्पना सुचवाव्यात असेही जाहिर करण्यात आले.

या प्रसंगी सर्वश्री अशोक जैन, श्रीमती नयनतारा बाफना, प्रदीप रायसोनी, विजय चोरडीय, श्रीमती ताराबाई डाकलिया, अजय ललवाणी, ललित लोडाया, पवन श्यामसुखा, राजेश जैन, अनिल कोठारी, राजकुमार सेठिया, गौतम प्रसादीचे लाभार्थी परिवार सदस्य जवाहरलाल संघवी, पारस राका, अजय राखेच्या यांच्यासह गणमान्य व्यक्ती, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. युवा व महिला यांनी लक्षणिय उपस्थिती नोंदविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वरूप लुंकड यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम