“तू भाई झाला का?” म्हणत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; जळगावात धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा...

“तू भाई झाला का?” म्हणत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; जळगावात धक्कादायक प्रकार

जळगाव : “तू भाई झाला का, पोलीस स्टेशनला का आला होता?” असे म्हणत दोघांनी तरुणाला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील बालाजी इंडस्ट्रीजजवळ घडली.

रायपूर (ता. जळगाव) येथील राजकिरण मानसिंग परदेशी (वय २६) हा तरुण कामानिमित्त जात असताना संशयितांनी त्याला गाडीवरून खाली उतरवले. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करून एका आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला. जखमी अवस्थेत परदेशी यांनी उपचार घेतल्यानंतर पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात कृष्णा शिंदे व मयूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम