
तृतीय वर्षातील बी.ए. (हिंदी) विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींना ‘कै. डॉ.पितांबर चिमण सरोदे यांच्या नावे सुवर्णपदक’
तृतीय वर्षातील बी.ए. (हिंदी) विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींना ‘कै. डॉ.पितांबर चिमण सरोदे यांच्या नावे सुवर्णपदक’
जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेतील परीक्षांमध्ये तृतीय वर्षातील बी.ए. (हिंदी) विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींना ‘कै. डॉ.पितांबर चिमण सरोदे यांच्या नावे सुवर्णपदक’ प्रदान करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत हिंदी राष्ट्रभाषेचे प्रचारक , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कै. डॉ.पितांबर चिमण सरोदे यांच्या नावे सुवर्ण पदकासाठी नितीन चिनावलकर देणगी दिली आहे. हे सुवर्णपदक सुरु झाल्यामुळे मानव्यविद्या (बी.ए.हिंदी) शाखेतील विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रेरणामिळून समाजाप्रती एक सुजाण संस्कारशील व्यक्तीमत्व घडावे या उदात हेतूने नितीन वसंत चिनावलकर यांनी ही देणगी दिली आहे. या विषयात अभ्यासाची प्रेरणा निर्माण होणार असून गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्याची ही एक आदर्श परंपरा ठरेल, असा विश्वास कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी यांनी व्यक्त करत विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळावी आणि महिला विद्यार्थिनींना स्पर्धात्मक वातावरणात प्रोत्साहन मिळावे यासाठी या सुवर्णपदकाचा उपयोग होईल. शिक्षण क्षेत्रातील अशी देणगी प्रेरणादायी असून यामुळे इतर दानशूर व्यक्तींनाही शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याची प्रेरणा मिळेल असे म्हटले आहे.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, नितीन चिनावलकर, सौ.चिनावलकर व उपवित्त व लेखाधिकारी सोमनाथ गोहिल उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम