तेरा वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण

जळगाव तालुक्यात खळबळ

बातमी शेअर करा...

तेरा वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण

जळगाव तालुक्यात खळबळ

जळगाव | प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाचा अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी, ५ मे रोजी दुपारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा सोमवारी दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान घरी एकटा होता. याच वेळेत एका अज्ञात व्यक्तीने त्याला आमिष दाखवून फूस लावत अपहरण केले. काही वेळाने ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने परिसरात मुलाचा शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही.

यामुळे पालकांनी त्वरित जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही घटना गंभीर असून पोलिसांकडून मुलाच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम