त्रिपुरात १ कोटीच्या मादक पदार्थांसह दोघे अटकेत

ट्रकमध्ये १ लाख २४ हजार याबा गोळ्या आढळल्या

बातमी शेअर करा...

त्रिपुरात १ कोटीच्या मादक पदार्थांसह दोघे अटकेत
ट्रकमध्ये १ लाख २४ हजार याबा गोळ्या आढळल्या
अगरतळा I वृत्तसंस्था

पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात एका ट्रकमधून १ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह (प्रतिबंधित याबा गोळ्या) दोन तस्करांना रविवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अमली पदार्थ तस्करीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने बटाला परिसरात मोहीम राबवण्यात आली. यावेळी मेघालयातून आलेल्या एका ट्रकची झडती घेण्यात आली.

यावेळी ट्रकमध्ये १ लाख २४ हजार याबा गोळ्या आढळल्या. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालक जमाल हुसैन व त्याचा सहकारी मिंटू बर्मन या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत, असे पोलीस अधीक्षक किरण कुमार म्हणाले.

भारतात ‘मेथैम्फेटामाइन’ने बनवलेल्या याबा गोळ्यांवर बंदी आहे, हे विशेष. दरम्यान, या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करीत अमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटचा शोध घेतला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम