थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या कुटुंबीयांना मानसिक आर्थिक पाठिंबा द्यावा – डॉ. नेमाडे

रोटरी क्लब जळगावतर्फे व्याख्यानाचे आयोजन

बातमी शेअर करा...

थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या कुटुंबीयांना
मानसिक आर्थिक पाठिंबा द्यावा – डॉ. नेमाडे

रोटरी क्लब जळगावतर्फे व्याख्यानाचे आयोजन

जळगाव – थॅलेसेमिया हा आजार काहीसा वेदनादायी व बराचसा खर्चिक असल्यामुळे समाजाने या मुलांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मानसिक व आर्थिक दृष्ट्या उभे राहिले पाहिजे असे डॉ.सई नेमाडे यांनी प्रतिपादन केले.
रोटरी क्लब जळगाव तर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये शनिवार दि.२२ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित जाहीर व्याख्यानात त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, मानद सचिव पराग अग्रवाल, मेडिकल कमिटी चेअरमन
डॉ. जयंत जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार असून आई-वडिलांकडून मुलांना होतो असे सांगून डॉक्टर सई नेमाडे यांनी व्याख्यानाच्या प्रारंभी थॅलेसेमिया म्हणजे काय आहे हे सांगितले.
नंतर सविस्तर पद्धतीने पावर पॉइंटद्वारे थॅलेसेमिया कसा होऊ शकतो याची माहिती देत, देशात दरवर्षी दहा हजार थॅलेसेमियाग्रस्त मुले जन्माला येतात, तर जळगाव जिल्ह्यात असे ३५० मुले असल्याचे त्यांनी सांगितले.
थॅलेसेमियाची लक्षणे सांगून उपचार पद्धतीची माहिती त्यांनी दिली. त्यात या मुलांना दर पंधरा दिवसांनी रक्त घ्यावे लागते. काही तपासण्या वेळोवेळी कराव्या लागतात. तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा त्यावरील उपचाराचा पर्याय असल्याचेही डॉ. नेमाडे म्हणाल्या.
थॅलेसेमिया मुक्त समाज निर्मितीसाठी लग्ना आधी वरवधूंची ही तपासणी करावी. नात्यात लग्न करू नये. ग्रामीण भागात याविषयी जनजागृतीची गरज असून, ते मोठे आव्हान आहे. दर तीन महिन्यांनी जास्तीत जास्त निरोगी व्यक्तींनी या मुलांसाठी रक्तदान करावे, असे त्यांनी शेवटी आवाहन केले. उपस्थितांच्या प्रश्नांना डॉ. नेमाडे यांनी उत्तरे दिली.
कार्यक्रमास रोटरीचे जितेंद्र ढाके, राघवेंद्र काबरा, योगेश गांधी, गिरीश कुलकर्णी, डॉ. लोकेश चौधरी, डॉ. हर्षवर्धन जोशी, डॉ. माधुरी कासट, डॉ. चित्रांगी जोशी, डॉ. सोनाली मंत्री, डॉ. लीना बडगुजर या मान्यवरांसह रोटरीचे सदस्य आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम