दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सुरेश नाईक यांचा एक लाखाचा निधी

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हमल्याच्या बाबत भारताने प्रत्युत्तर द्यावे यासाठी पंतप्रधान निधित रावेरातील सुरेश नाईक यांनी एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.
काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी असाहाय्य पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्या निषेधार्थ संपूर्ण भारतभरात विद्रोहाची लाटू सुरु आहे. या भ्याड हल्ल्याने संतप्त झालेल्या देशवासियान्सोबत रावेरकरहि संतप्त झाले आहे.  त्या अनुषंगाने दहशतवाद्यांचा संपूर्ण नायनाट व  बिमोड करून त्यांना यमसदनी पाठवावे अशी इच्छा असलेले दुर्दम्य व अगम्य इच्छाशक्तीचे रावेर शहरातील केळी व्यापारी सुरेश नाईक यांनी एक लाख एक हजार रुपयांचा निधी येथील निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे सुपूर्त गेलेला आहे.
याबाबत पंचक्रोशीतील नागरिकांकडून व देशवासयांकडून श्री नाईक यांचे कौतुक होत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम