
दहा वर्षांत चोपडा तालुक्याची विकासाकडे ऐतिहासिक वाटचाल…!
दहा वर्षांत चोपडा तालुक्याची विकासाकडे ऐतिहासिक वाटचाल…!
“कार्यसम्राट” आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बदलते वास्तव…
चोपडा विशेष प्रतिनिधी
इतिहास ज्या काळात घडतो, तो काळच पुढे जाऊन “ऐतिहासिक” ठरतो. चोपडा तालुक्याच्या दृष्टीने सन २०१४ हे असेच एक परिवर्तनाचे पर्व ठरले. शासनाच्या योजना केवळ जाहिरातींमध्ये न राहता जनतेच्या दारात पोहोचू लागल्या, विकासाच्या संकल्पना केवळ घोषणांपुरत्या न राहता प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाली – आणि या साऱ्या क्रांतीचा केंद्रबिंदू ठरले, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे.
२०१४ पूर्वीही योजना होत्या, परंतु त्या तितक्याच कागदोपत्री मर्यादित होत्या. प्रशासनाचा गतीमान सहभाग नसल्याने सामान्य जनता योजनांपासून वंचित राहत होती. मात्र आ. सोनवणे यांच्या कार्यतत्पर नेतृत्वाने या परिस्थितीला कलाटणी दिली. तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आयुष्याला खऱ्या अर्थाने गती मिळाली.
गावागावांत, वाड्यावस्त्यांत – अगदी शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचल्या. आजही आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे नियमितपणे प्रशासकीय बैठका घेऊन विकासकामांचा आढावा घेतात. अडथळे आले, तर तत्काळ सूचना देऊन काम मार्गी लावतात. हीच एक प्रभावी नेतृत्वाची ओळख आहे.
शहरापासून ते आदिवासी भागांपर्यंत विकासाची समानधर्म्यता त्यांनी जपली. जात, धर्म, पक्ष किंवा विचार यापलीकडे जाऊन, ‘माणूस’ हाच केंद्रबिंदू ठेवून काम करणाऱ्या या नेतृत्वाला जनतेने मनापासून “कार्यसम्राट” ही उपाधी बहाल केली.
शेतकऱ्यांवर संकटे आली, की आ. सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा हात धरला. कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो, की नुकसानभरपाईचा प्रश्न — शासनदरबारी आवाज बुलंद करण्याचं काम या दोघांनी सातत्याने केलं.
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती, नवीन बसस्थानक, सुसज्ज रस्ते, गुणवत्तापूर्ण वसतिगृह, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, महिला सक्षमीकरण योजना, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे – या सर्व क्षेत्रांत आज चोपडा तालुका स्वतःची ओळख निर्माण करत आहे. ‘विकास’ हा शब्द आज केवळ भाषणात नसून तो रस्त्यावर, संस्थांमध्ये, लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि जनतेच्या समाधानात दिसून येतो.
या दहा वर्षांच्या कार्यकाळात, आ. सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांनी चोपडा तालुक्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानामुळे आज चोपडा तालुका जिल्ह्यात आदर्श ठरत आहे. परिवर्तनाचा आणि प्रगतीचा हा प्रवास सुरूच राहो, हीच जनतेची अपेक्षा आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम