दहिवद फाट्याजवळ भीषण अपघात ; 3 ठार 4 जखमी

ट्रिपल सीट मोटरसायकल आणि ओमनीची समोरासमोर धडक

बातमी शेअर करा...

दहिवद फाट्याजवळ भीषण अपघात ; 3 ठार 4 जखमी

ट्रिपल सीट मोटरसायकल आणि ओमनीची समोरासमोर धडक

चोपडा । मन्सूर तडवी 

चोपडा शहरातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोपडा येथून सहा मुले अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे केटरिंग चे कामा करता

मोटरसायकल ने ट्रिपल सीट ने जात असताना अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमनी आणि मोटरसायकलच्या ट्रिपल सीट वर बसलेल्या गाडीचा

दहिवद

समोरासमोर अपघात होऊन चोपडा शहरातील 3 जण जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाल्याची घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली असुन

चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी व लोहिया नगर मधील एक पाटील व शिवाजी नगर मधील एक व्यक्ती असे तिघे जण मयत झाले आहेत.

तर चार जण जखमी आहेत. ज्ञानेश्वर सोनार रा. सुरत याला डॉ. सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे.

एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर जखमींना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/share/p/1Xf3AAiGGP/

मयत व जखमी हे मंगरूळ येथे केटरर्स चे काम करण्यासाठी आल्याचे समजते.

हे ही वाचा👇

Excise चे राजकिरण सोनवणेच्या घरावर छापा; कोट्यवधींच्या संपत्तीचा पर्दाफाश; सुमारे 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम