सकाळी सात वाजेपासूनच मिळतेय दारू ; शासकीय नियमांची पायमल्ली, शासनाचे आदेश काय ?

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण संबंध ? 

बातमी शेअर करा...

सकाळी सात वाजेपासूनच मिळतेय दारू ; शासकीय नियमांची पायमल्ली, शासनाचे आदेश काय ?

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण संबंध ? 

कारवाई शून्य ?

सावदा l प्रतिनिधी 

मद्याच्या नशेत भावी पिढी उद्ध्वस्त होत आहे. असे असतानाही निव्व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे शासकीय नियमांनाच पायदळी तुडवले जात आहे.

प्रत्यक्षात शासनाचे निर्देश काय आहेत ?

शहरातील देशीदारू विक्री दुकान 8 वाजता व विदेशी दारूची दुकाने सकाळी 10 वाजेनंतर उघडण्यात यावीत, असा शासकीय नियम आहे. प्रत्यक्षात मात्र, सकाळी तांबडे फुटत नाही तोच तळीरामांची सोय होताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे होणारे दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम, सकाळपासूनच शहरात राजरोसपणे मद्याची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.

सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे स्थानिक पोलिस मात्र देशी दारू दुकानांविरोधात कारवाई करताना ‘डगमगताना’ दिसत आहेत. यामुळे सामान्यांना मद्यपींच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. देशी दारूसाठी व्यसनमुक्ती धोरण व उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यांना मूठमाती देण्यात येत आहे.

मद्याच्या दुकान परवानाधारक मद्य विक्रेत्यांना उत्पादनशुल्क विभागाकडून वेळेच्या र्मयादा घालून दिलेल्या असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसत असूनही त्याकडे विभागाकडून डोळेझाक केले जात आहे.

देव दर्शनासाठी जाणारे भाविक तळीरामांमुळे त्रस्त

शहरात विशेषत: विशेषतः सोमेश्वर नगर, भानू सरकार नगर, श्रीकृष्णा कॉलनी, कृषी उत्पन्न बाजार समिती मागील बाजूची कॉलनी, सुगगा नगर, साई मंदिर मागील कॉलनी, येथील लोक देव दर्शनासाठी दुर्गा देवी मंदिरासह लहान मोठा मारोती मंदिर, स्वामी समर्थ मंदिर येथे देव दर्शनासाठी तसेच मशिदींमध्ये प्रार्थनेसाठी येणार्‍या भाविकांना परिसरातील देशी-विदेशी दारू विक्री दुकानातून बाहेर पडणार्‍या मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे.

या भागातील परवानाधारक विक्रेते सकाळी 7 वाजेपासून टप्प्याटप्याने दुकाने उघडत असून, त्याच वेळी मद्यपीही सर्रासपणे मद्य विकत घेऊन रस्त्यावरच ते पिताना दिसतात. काही मद्यपी रस्त्यावरच धुमाकूळ घालत शिवीगाळ करीत असल्याची तक्रारही मंदिरात जाणार्‍या वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

विद्यार्थी, पालकांनाही त्रास

शहर व परिसरातील मंदिरांत ज्याप्रमाणे भाविकांना मद्यपींचा त्रास सोसावा लागत आहे. तसाच त्रास शाळांमध्ये विद्यार्थी सोडविण्यासाठी येणार्‍या पालकांनाही मद्यपींच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. या मद्यपींकडून दिवसाच्या सुरुवातीला सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारासच भांडणे करून यथेच्छ शिवीगाळ सुरू असते. त्यामुळे बालवाडी ते प्राथमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या कानी अशा शिव्या पडून त्यांच्या मनावरही परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ व पालकांचे म्हणणे आहे. असे दृश्य साधारणत: दरररोज बघण्यास मिळते.

या कायद्यान्वये होते कारवाई

देशी-विदेशी मद्य विक्रेते हॉटेल्स, परमीटरूम-बिअरबार चालकांना शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनुज्ञप्ती आवश्यक असते. सदरची अनुज्ञप्तीधारक विक्रेत्यांना विविध अटी लागू करण्यात येतात. यात दुकानांच्या वेळा ठरवून दिल्या आहेत, त्याचबरोबर विक्रेत्यांना दररोजचा मद्याचा उपलब्ध साठा, विक्रीच्या नोंदी ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे.

त्याचबरोबर वयाने सज्ञात असलेल्यांनाच मद्य विक्रीचा आणि मद्य पिण्याचा परवाना असणार्‍यांना हॉटेलमध्ये मद्य पिण्यासाठी बसू देण्याचा नियम आहे, अशा प्रकारचे उल्लंघन करणार्‍या दुकानांवर मुंबई दारूबंदी कायदा कलम 104 अन्वये आणि अनुज्ञप्ती शर्थींचे उल्लंघन केल्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येते.

विभागाच्या भरारी पथकामार्फत दुकानदारांना नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे कारवाईचा प्रस्ताव सादर करून त्यांच्या मंजुरीनुसार दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये कमीत कमी 1 हजार ते 50 हजारांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

दुकानांच्या वेळा
1) वॉइन शॉप (एफएल-2 अनुज्ञप्ती)- सकाळी 10 ते रात्री 10.30 पर्यंत.

2) परमिटरूम (एफएल/ बी आर-2 अनुज्ञप्ती)- सकाळी 10.00 ते रात्री10.30 वाजेपर्

3) परमिटरूम (एफएल- 3)- मनपा हद्द वगळून इतर ठिकाणी स. 11.30 ते 11.30.

4) बिअरबार फार्म ‘ई’- सकाळी 11.30 ते रात्री 11.30

5)विदेशी मद्यनिर्मिती, आसवणी (फार्म इ)- सकाळी 11.30 ते ते रात्री 11.30.

6) (एफएल-4)सकाळी 11.30 ते रात्री 11.30.

7) देशी दारू विक्री (सीएल-3) सकाळी -8.00 ते रात्री10.00 जिल्हा परिषद परिसर, क वर्ग नगरपालिका, सकाळी 8.00 ते रात्री 11.00 ब वर्ग नगरपालिका v त्यावरील सर्व नगर नगरपालिका

काय सांगतो नियम?

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रीच्या अधिकृत परवानाधारकांना मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत अनुज्ञप्ती शर्थींचे नियमन घालून दिले आहे. यानुसार, मद्यविक्रेत्यांना दररोजच्या दुकान उघडण्याच्या, मधली सुटीच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. त्यात शासनाने ठरवून दिलेल्या महत्त्वाच्या दिवशी मद्य विक्रीस बंदी घातलेली असून, त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेशात म्हटले आहे.

यामध्ये राष्ट्रपुरुषांच्या जयंती, धार्मिक उत्सव, सण आणि निवडणुका, मतमोजणीच्या दिवसांचा समावेश आहे. त्यात जिल्हाधिकार्‍यांना स्थानिक पातळीवरदेखील ड्राय डे घोषित करण्याचे अधिकार प्राप्त आहेत.

परिसरातील तरुण नशेमुळे विविध आजारांनी त्रस्त असून फार तरुण अकाली मयत झालेले आहेत याबाबत राज्य उत्पादन शुल्क, स्थानिक पोलिस प्रशासन यांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी सावदा व परिसरातून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम